पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग) ५२ वे विज्ञान प्रदर्शन
पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग) ५२ वे विज्ञान प्रदर्शन कै. सचिनभाऊ शेळके इंग्लिश स्कूल तळेगाव येथे दिनांक ३/१/२०२५ ते ४/१/२०२५ रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये आपल्या महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळा कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे येथील इयत्ता 9 वी ते 12 वी गटात निकिता बुरुड व समीक्षा वाजे यांचा व्दितीय क्रमांक आला आहे. तसेच शिक्षक गटात श्री. डुंबरे सर यांचा प्रथम क्रमांक आला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा