76 वा प्रजासत्ताक दिन

20 Feb 2025 14:00:08
76 वा प्रजासत्ताक दिन महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत मध्ये उत्साहात संपन्न.
 
76 प्रजासत्ताक दिन _1
 कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेमध्ये रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले .कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मा. श्री.हेमंतजी दाभाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाहक, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे उपसचिव मा. श्री. प्रदीपजी वाजे , शाळा समिती सदस्य मा. श्री.धनंजय वाडेकर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे ,माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. तुकाराम पवार तसेच मा. श्री. सदानंदजी कुलकर्णी ,सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री. शंकर नाना शिंदे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वज पूजन करून ध्वजारोहण संपन्न झाले.या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,कामशेत येथील नागरिक ,पालक व विद्यार्थी मैदानावर उपस्थित होते.
 राष्ट्रध्वजाला सर्वात प्रथम सलामी देऊन ध्वज गीत गायन झाले .त्यानंतर राष्ट्रगीत ,राज्यगीत गायन करण्यात आले. त्यानंतर संविधानाचं वाचन करण्यात आले. राष्ट्रध्वज व आलेल्या प्रमुख पाहुण्यांना विद्यार्थिनीच्या पथकाने संचलनाच्याद्वारे मानवंदना दिली. इयत्ता पहिली ते दहावी सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत याचे प्रात्यक्षिकेचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका श्रीमती पद्मिनी कांबळे यांनी केले . कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय तुकाराम पवार सर यांनी करून दिला. राज्य पातळीवर क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सानिया होले, दीक्षा मोरमारे व आरती भोकटे यांचा येथोचित्त सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट काम करणारी इयत्ता नववीची निकिता बुरुड व मार्गदर्शक शिक्षक अजित डुंबरे सर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे श्री.हेमंतजी दाभाडे यांनी मनोगतातून प्राचीन भारत, स्वातंत्र्य सेनानी भारताची भौगोलिक परिस्थिती, शक्ती ,बुद्धी ,अनुशासन, साहस, सामाजिक संघटन या पंचसूत्रीद्वारे जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले भारतातील विविधतेत एकता या विषयावर सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले . शेवटी परिश्रमाशिवाय यश मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी परिश्रम करण्याचे आव्हान त्यांनी केले .शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर भाषण स्पर्धा ,देशभक्तीपर काव्यवाचन स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ खैरनार व संजय हांडे यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0