Remedial class ( उपचारात्मक अध्ययन)
विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयांमध्ये असलेल्या शैक्षणिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या शिकण्यातील अंतर भरून काढण्यासाठी शाळेमध्ये शालेय व्यतिरिक्त घड्याळी एक तास उपचारात्मक अध्ययन प्रत्येक येथे तील विद्यार्थ्यांना केले जाते विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांचा विकास केला जातो तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी व शैक्षणिक प्रगती साधण्यास मदत करत आहे.

उपचारात्मक वर्गांची उद्दिष्टे:-
1) विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण ओळखणे व ते दूर करणे.
2) मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे.
3) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे .
4) स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
5) शिक्षणात आवड व रस निर्माण करणे .

उपचारात्मक अध्यापनाची पद्धती:-
1) विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन शिकविणे .
2) लहान गटातून शिक्षण देणे.
3) भरपूर सराव करून घेणे .
4) ई-लर्निंग, युट्युब ,स्मार्ट बोर्डचा वापर करणे.
5) सोपी पुस्तके व पाठ्यपुस्तक चित्रांचा वापर भरपूर करणे.