

नमस्कार , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळा कामशेत या शाखेत आपले हार्दिक स्वागत आहे. आश्रमशाळेची स्थापना 18 नोव्हेंबर 1986 साली आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शाळेची स्थापना करण्यात आली. शाळेची ध्येय-धोरणे पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. सध्या शाळेमध्ये 418 विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत.पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अडचणींवर प्रभावी तोडगा काढून त्यांची प्रगती साधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कामगिरी नेहमीच उंचावणारी असून विद्यार्थी संस्कारक्षम, अनुशासनात्मक वातावरणात शिक्षण घेऊन सर्वगुणसंपन्न होत आहेत. शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा , मंथन परीक्षा, एकलव्य रेसिडेन्सीएल परीक्षा, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा ,नवोदय परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, शासकीय चित्रकला स्पर्धा, सुपर 50 इंजिनिअरिंग व वैद्यकीय पात्रता परीक्षा, संस्था अंतर्गत व आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी शिक्षक शाळेतमध्ये जादा तासिका घेऊन करतात. आजच्या युगात शाळेत शिक्षण घेवून गेलेले विद्यार्थी वेगवेगळ्या उच्चपदावर कार्यरत आहेत.