राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर
एकात्मिक आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे दिनांक ३/१/२०२५ ते ५/१/२०२५ पोलिस ग्राउंड नागपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत ठाणे विभागातून विभागीय स्तरावर निवड झालेल्या आमच्या महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळा ,कामशेत तालुका -मावळ, जिल्हा -पुणे येथील दीक्षा अनंता मोरमारे, व आरती रखमा भोकटे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलींचा 14 वर्षे वयोगट कबड्डी संघ निवड झाली .आज रोजी झालेल्या कबड्डी संघामध्ये ठाणे विभाग विरुद्ध अमरावती विभाग यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या कबड्डी संघात ठाणे विभागातील 14 वर्षे वयोगट मुली उपविजेता संघ ठरला या संघात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव मधील इतर शाळांच्या देखील विद्यार्थिनी सहभागी होत्या त्याचप्रमाणे सानिया स्वामी होले हिने देखील उंच उडी स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय सहभाग नोंदवला आहे तिलाही उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
सहभागी खेळाडूंना श्री. नवनाथ भवारी सर, सुरेश दुर्गुडे सर,सुरेश गोगावले सर, सौ. प्रेमकला पाठक मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे. आपल्या यशस्वी नियोजनामुळेच सदर विद्यार्थ्यानी यांनी यश प्राप्त केले. याबद्दल महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकारी व प्रकल्प कार्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद