Kishori Vikas Shibhir

22 May 2024 14:17:07
किशोरी विकास शिबिर

किशोरवयीन शिबीर 
 
                     किशोरी विकास शिबीर म्हणजे किशोरवयीन मुलींसाठी घेतले जाणारे शिबिर होय. यामध्ये त्यांच्यासाठी आरोग्य ,शिक्षण, स्वच्छता, आत्मसन्मान आणि जीवन कौशल्य यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले जाते. या शिबिरामध्ये यामध्ये इयत्ता सहावी ते दहावी( वय 11 ते 18 वर्ष) विद्यार्थिनी उपस्थित असतात. त्याचबरोबर आरोग्य अधिकारी, नर्स, मुख्याध्यापिका, शिक्षिका वस्तीगृह अधीक्षिका या उपस्थित असतात.
 
शिबिराची उद्दिष्टे:-
 
       1) किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी मनच उपलब्ध करून देणे .
       2) स्वच्छता बद्दल जागता निर्माण करणे (शारीरिक ,मानसिक आणि सामाजिक)
       3)स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे शिकविणे.
       4) आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवणे.
       5)लैंगिक शिक्षण आणि मासिक पाळीबद्दल वैज्ञानिक माहिती देणे .
 
शिबिराचे मुख्य उपक्रम(विषय) :-
 
      1) आरोग्य आणि पोषण
            संतुलित आहाराचे महत्व, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेची काळजी आणि ॲनिमिया( रक्तातील कमतरता)         
            टाळण्यासाठी उपाय 
     2) व्यक्तिमत्व विकास
            आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्याख्याने व चर्चा ,नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्य
     3) मानसिक आरोग्य
            तणाव व्यवस्थापन ,सकारात्मक विचारांची जाणीव
     4) कायदा आणि हक्क
            किशोरीचे हक्क आणि कायदेशीर संरक्षण ,बालविवाह प्रतिबंध ,लैंगिक शोषणासाठी संबंधीची माहिती
     5) जीवन कौशल्य
            निर्णय घेण्याची कला, वेळ व्यवस्थापन, समुपदेशन आणि समस्या समाधान कला आणि सर्जनशीलता
            चित्रकला ,नृत्य ,नाटक ,हस्तकला यांचे आयोजन
 
शिबिराचे फायदे :-
 
     1) किशोर मुलींमध्ये आत्मभान निर्माण होते.
     2) शरीर व मन यांच्या आरोग्याकडे लक्ष वेधले जाते .
     3) शालेय गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
     4) भविष्याच्या दृष्टीने सक्षम आणि जबाबदार नागरिक घडविणे.

किशोरवयीन शिबीर 
Powered By Sangraha 9.0