विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी...
मानवाचे रूप , स्वभाव , वर्तणूक , दृष्टीकोन , चारित्र्य , बुद्धिमत्ता , कौशल्ये , भाव-भावना , संवेदनशीलता गुण-अवगुण , सामाजिक प्रतिमा या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय. असे व्यक्तिमत्व फुलविण्यासाठी विद्यार्थ्याचा सामाजिक , मानसिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी आश्रमशाळेत अनेक कार्यक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांचा भाषिक विकास होण्यासाठी Spoken English , संस्कृत संभाषण वर्ग हे सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित झाले असून ज्ञान व विचारशक्ती वृद्धिंगत होत आहे. विद्यार्थी संस्कृत इंग्रजी भाषेमधून आपले मत व्याख्याने , सूत्रसंचालन व भाषणातून व्यक्त करतात. तसेच विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेतूनही व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
इ.९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी व्यक्तिमत्व शिबिरांचे आयोजन केले जाते. आधुनिक जगात वावरण्याबरोबरच शिक्षणाच्या अनेक संधी व कोर्सेस च्या मार्गदर्शनाचे आयोजन केले जाते.
श्रीट्रस्ट संस्थान , कार्ला आयोजित विद्यार्थ्यांना दर रविवारी संस्कृत व इंग्रजी संभाषणाचे मार्गदर्शन केले जाते. तसेच बौध्दिक खेळाचे देखील आयोजन केले जाते.