शेती कौशल्य
शेती कौशल्य माणसाला पारंपरिक अनुभवातून, आधुनिक तंत्रज्ञानातून किंवा प्रशिक्षणातून मिळू शकत होते. पण आज शाळेतील विद्यार्थ्यांना ही सर्व कौशल्य आत्मसात व्हावीत म्हणून शाळेत हा प्रकल्प सुरू केला आहे.
महत्त्वाची कौशल्ये
१) मृदा व्यवस्थापन (मातीची चाचणी, योग्य खतांचा वापर, मातीची सुपीकता टिकवणे)
२) पीक निवड व त्याचे नियोजन
३) पाणी सिंचन व्यवस्थापन४)पिकावरील कीड व रोग नियंत्रण
५) आधुनिक यंत्र व तंत्रज्ञानाचा वापर
६) बाजारपेठ व विक्री कौशल्य
७) आर्थिक नियोजन
८) पर्यावरण पूरक शेती
९) नेतृत्व संघटन कौशल्य
१०) गांडूळ खत निर्मिती
११)दूधभेसळ परीक्षण
१२)अन्नभेसळ परीक्षण
१३)कौशल्य उपयुक्त क्षेत्रभेटी
१४)कौशल्याधारित तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यान व मार्गदर्शन
हस्तकला कौशल्ये (FINE MOTOR SKILLS)
कागदी फुले ,राखी , आकाश कंदील तयार करणे व पणती रंगवणे हे एक सुंदर व सर्जनशील कौशल्य व उपयुक्त कौशल्य आहे. ही सर्व कौशल्य हस्तकलेच्या श्रेणीत येतात. याचा उपयोग सणाच्या निमित्ताने घर सजावटीसाठी, भेटवस्तू पॅकिंगसाठी ,विविध सणाच्या निमित्ताने व शाळेतील एक प्रकल्पासाठी केला जातो .
महत्त्वाची कौशल्ये

१)कागद कापाकापी आणि घड्या घालण्याचे तंत्र
२) रंगसंगती व वेगवेगळी डिझाईन
३)कल्पनाशक्ती व विचारशक्ती वाव देणे
४) संयम राखणे
५)लहान सहान वस्तू हाताळण्याची सफाई
६)कागद ,दोरा , गोंद, मनी ,टिकल्या व कैची यांचा योग्य वापर
७) वेगवेगळी आकाराची फुले, आकाश कंदील ,राखी तयार करणे
८)पणती स्वच्छता करून आकर्षक रंगवणे
९)बाजारपेठ व विक्री
१०)आर्थिक नियोजन
११) नेतृत्व व संघटन कौशल्य
१२)पर्यावरण पूरक साहित्याचा वापर
१३)आधुनिक तंत्रज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर