महर्षी कर्वे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

प्रवेशोत्सव 2025-26

आश्रमशाळा, कामशेत    17-Sep-2025
Total Views |
 महर्षी कर्वे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..
 

प्रवेशउत्सव_1  कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेमध्ये आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी सकाळी ११.००वाजता शाळेच्या सभागृहामध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. इयत्ता पहिलीच्या वर्गातील नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे स्वागत करणे हे या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेमध्ये आज प्रभात फेरी काढण्यात आली होती .पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांचे औक्षण शाळेतील शिक्षिका पाठक मॅडम कांबळे मॅडम गुजर मॅडम पाटील मॅडम पारधी मॅडम भांगरे मॅडम यांनी केले . कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांना गुलाब पुष्प तसेच खाऊ देऊ त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मा डॉक्टर कृष्णकांत वढावकर साहेब, घोडेगाव प्रकल्पाचे मा. सुहास शिंदे साहेब, तसेच शाला समिती सदस्य मा. धनंजय वाडेकर ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. प्रदीप वाजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक पंढरीनाथ वाडेकर यांनी करून दिला. आज शाळेत इयत्ता दुसरी ते इयत्ता दहावी पर्यंत उपस्थित असणारे विद्यार्थी यांचेही पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता दहावी मध्ये पहिले पाच गुणवंत विद्यार्थिनींचे स्वागत व बक्षीस वितरण देखील पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केले व सर्वांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेमध्ये शिक्षक पालक सभा देखील घेण्यात आली. कार्यक्रमाची सांगता पसायदान्य झाली. कार्यक्रमाचे आभार गोकुळ खैरनार यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय हांडे यांनी केले.
 
 
1