स्वातंत्र्य दिन..

17 Sep 2025 15:28:59
स्वातंत्र्य दिन..
 
    कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.   
                                                                                                                                 
संस्थेच्या प्रांगणात लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे व वास्तु विशारद संघाचे स्वयंसेवक मयूर राजगुरव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. निर्मल वारीचे संयोजक संतोष लोणकर, धनंजय वाडेकर, विक्रम बाफना, युवराज शिंदे, शंकरराव शिंदे, मुख्याध्यापिका अनिता देवरे आदी उपस्थित होते. सचिन टेकवडे यांनी लोहगड किल्ला विषयीचा इतिहास व त्याची युनोस्कोच्या यादीमध्ये झालेली नोंद याबाबत माहिती दिली. ऐश्वर्या रणदिवे यांनी विद्यार्थ्यांना 'वाचनाई' या पुस्तकाची मराठी व इंग्रजी आवृत्ती असलेली पुस्तके दिली. पंढरीनाथ वाडेकर, जयश्री सांबरी, तन्मय पिचड, कोमल गावडे, पूजा ठाकर, हिंदवी लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रदीप वाजे यांनी प्रास्ताविक केले. अजित डुंबरे यांनी सूत्रसंचालन केले.

          स्वतंत्र दिन 
स्वतंत्र दिन
Powered By Sangraha 9.0