आंतरराष्ट्रीय योग दिन..
महर्षी कर्वे आश्रम शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. योगा शिक्षक दत्ताराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्राणायामाचे महत्त्व सांगितले. पंढरीनाथ वाडेकर, पद्मिनी कांबळे यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले. प्रेमकला पाठक, शिक्षक अजित डुंबरे यांनी विविध योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवली.
